दुर्गुणांची होळी करूया, स्नेहाचे रंग उधळूया होळी, धुलीवंदनानिमित्त सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभेच्छा

0

 

चंद्रपूर, दि. 6 मार्च 2023:

“दुर्गुणांची होळी करूया, स्नेहाचे या रंग उधळूया” अशा शब्दात महाराष्ट्राचे वने, (Cultural Affairs and Fisheries Minister Shri Sudhir Mungantiwar)  सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना होळी तसेच धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

समाजातील द्वेष, राग, मद, मत्सर, आळस आदी सर्व दुर्गुण आणि अस्वच्छता, रोग, दारिद्र्य आदी समाजशत्रू होळीच्या ज्वालेत सर्वांनी जाळून टाकावेत, मग हा रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आपोआप आनंदाचे रंग भरेल, असे ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. होळीपाठोपाठ येणारा, स्नेह बंधुभावाचे प्रतीक असलेला रंगोत्सव सामाजिक वीण अधिक घट्ट करो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अशीच रंगांची उधळण होवो अशा मनःपूर्वक शुभेच्छाही ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. मात्र होळी व रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाचे, वन संवर्धनाचे भान नागरिक राखतील याची खात्री आहे, असेही ते पुढे म्हणाले.