
• ट्रांझिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट योग्य पद्धतीने व सर्वंकष करण्यासाठी एशियाई विकास बँक (ADB) कडून 2.5 दशलक्ष (USD) चे तांत्रिक सहाय्य
• नागपूर आणि इंदौर शहरामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविल्या जाणार
(Nagpur):नागपूर : नागपूर शहरातील टीओडी झोन मध्ये पायभूत विकास कार्य,नियोजन,धोरण ठरविणे व तसेच विद्यमान धोरनामध्ये बदल करणे या संबंधी केंद्र शासनाच्या शहरी आवास व नगर विकास मंत्रालयाने नागपूर आणि इंदौर शहरामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्याचे योजिले आहे ज्यामध्ये एशियाई विकास बँकच्या (ADB) वतीने भारतीय शहरांमधील शहरी रूपांतरणासाठी ट्रांझिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (TOD) योग्य पद्धतीने व सर्वंकष करण्यासाठी एशियाई विकास बँक (ADB) कडून 2.5 दशलक्ष (USD) चे तांत्रिक सहाय्य करण्यात येणार आहे. आज या संबंधीची आढावा बैठक मेट्रो भवन येथे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर बैठकीला मनपा आयुक्त श्री. अभिजित चौधरी,नासुप्र सभापती श्री. संजय मीणा, महा मेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग व ऑपरेशन्स) श्री. अनिल कोकाटे आणि एडीबीचे अधिकारी शहरी विकास विशेषज्ञ श्रीमती.रामोला नाईक सिंगरु,श्री. टोमो उएडा,वरिष्ठ वाहतूक तज्ञ सौगाता दासगुप्ता उपस्थित होते.
या पायलट प्रोजेक्ट तांत्रिक सहाय्य (TA) कार्यक्रम अंतर्गत एशियन डेव्हलपमेंट बँक चमू भारताला ट्रांझिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (TOD) तत्त्वांवर आधारित शाश्वत शहरी वाढीच्या धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी मदत करेल व शासकीय यंत्रणाचे बळकटीकरण व टाऊन प्लॅनिंग स्कीम्स आणि तत्सम बाबींचा वापर करून ट्रांझिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट तत्वावर आधारित शाश्वत नागरी विकास नियोजन केल्या जाईल.
सदर तांत्रिक सहाय्य (TA) कार्यक्रम अंतर्गत खालील बाबींवर विशेष लक्ष्य दिल्या जाईल :
१.) राष्ट्रीय,राज्य आणि शहर पातळीवर सरकारी संस्थांच्या संस्थात्मक क्षमतांचे निर्माण संस्थांची क्षमता बळकट करण्यासाठी मदत करेल. यासाठी स्थानिक क्षेत्र नियोजन (Local Area Plan) टाउन प्लॅनिंग स्कीम्स किंवा इतर नियोजन प्रक्रिया वापरण्यात येतील
२) राज्य आणि शहर पातळीवर परिणामकारक धोरणात्मक चौकटींची निर्मिती, ज्यामध्ये शाश्वत, सर्वसमावेशक आणि एकत्रित उपाय सुचवण्यासाठी मदत होईल त्यामुळे नागरीकरणाची वाढ आणि एकत्रिततेमुळे होणारी उत्पादकता,भूविकासमूल्य मध्ये वाढ होईल तसेच महापालिकांच्या उत्पन्नाचा आधार विस्तारता येईल.
३.) भारतीय शहरे अधिक राहण्यायोग्य, सर्व सोयींनी उपयुक्त आणि तसेच भविष्यात प्रगतीपथावर चालणारे अशी रचना असावी.
याशिवाय, तांत्रिक सहाय्य कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर एक संवाद धोरण तयार करण्यास मदत करेल जे ट्रांझिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंटला (TOD) मास ट्रांझिट कॉरिडॉर असलेल्या शहरांसाठी विकास धोरण म्हणून प्रोत्साहन देईल आणि शहरी रूपांतरण सक्षम करेल. सदर बैठकीत पुढील कार्यवाही संदर्भात एडीबीच्या वतीने सादरीकरण करण्यात आले तसेच शहराच्या विकासासंबंधी अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली.