Home entertainment नागपुरातील भारत-न्यूझीलंड टी-20 सामन्यासाठी वाहतुकीत मोठा बदल

नागपुरातील भारत-न्यूझीलंड टी-20 सामन्यासाठी वाहतुकीत मोठा बदल

0

नागपुर (Nagpur) :-  नागपुरात आज होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 सामन्याच्या (India-New Zealand T20 Match) दृष्टीने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. सामन्याच्या दरम्यान वर्धा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने आज मॅचच्या काळात वर्धा मार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. तसेच पोलिसांकडून पार्किंगसाठी मैदानाकडे जागा निश्चित करण्यात आली आहे. तर स्टेडियमकडे वाहन येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले आहे.(Traffic Changes in Nagpur)

दरम्यानया मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वेळ वाचविण्यासाठी क्रिकेट रसिकांनी शक्यतोवर मेट्रोचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. दुसरीकडे एआयच्या माध्यमातून पार्किंगमध्ये किती जागा शिल्लक आहे, स्टेडियममध्ये कोणी क्रिमिनल व्यक्ती आला का? किंवा कोणाकडे शस्त्र आहे का? स्टेडियममध्ये कोणी गदारोळ करतोय का?यावर लक्ष असणार आहे.

-नागपूर ते वर्धाकडे जाणारी जड वाहतुक ही मुंडले शाळा कटींग येथुन डावे वळण घेवुन सरळ समृध्दी मार्गे

-तसेच जबलपूर कडुन वर्धा कडे जाणारी जड वाहतुक ही पांजरा टोल नाका कडुन सरळ समृध्दी मार्गे झीरो सर्कल पॉईट तेथुन डावे वळण घेवुन दाताळा मार्गे बुट्टीबोरी कडे जाईल.

-चंद्रपुर, हैद्राबाद, वर्धा कडुन नागपूर कडे येणारी जड वाहतुक ही बुट्टीबोरी कडुन दाताळा मार्गे समृध्दी झीरो सर्कल मार्गे उजवे वळण घेवुन माउली कटींग येथुन डावे वळण घेवुन वर्धा- नागपूर राष्ट्रीय माहामार्ग एन.एच-४४ ने नागपूर कडे जाईल.

-हिंगणा अमरावती मार्गे हैद्राबाद चंद्रपुर वर्धाकडे जाणारी जड वाहतुक ही समृध्दी झीरो सर्कल येथुन उजवे वळण घेवुन दाताळा मार्गे बुट्टीबोरी कडे जाईल.

-हैद्राबाद – वर्धा कडुन जबलपुर कडे जाणारी जड वाहतूक ही बुट्टीबोरी कडुन दाताळा मार्गे समृध्दी झीरो सर्कल येथुन उजवे वळण घेवुन एन. सी.आय, पांजरा टोल मार्गे जबलपुर कडे जातील.

-छत्रपती चौक ते डोंगरगाव टोल नाका पर्यंत सर्व जड वाहतूकी करीता बंद करण्यात येत आहे.