नागपूर: नरसेवा हीच नारायण सेवा हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे 16 ते 20 जानेवारी 2025 दरम्यान ग्रामायण उद्यम प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे भव्य प्रदर्शन अमृत भवन, आंध्र असोसिएशन, सीताबर्डी, नागपूर येथे सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत होणार असून, ग्राहकांसाठी प्रवेश नि:शुल्क राहणार आहे.
ग्रामायण प्रतिष्ठानचा प्रवास आणि उद्दिष्टे:
ग्रामायण प्रतिष्ठानने 2012 पासून ग्रामीण भागातील उपक्रम, पर्यावरण पूरक प्रकल्प, वर्कशॉप्स आणि सामाजिक सेवा या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले आहे. विविध उपक्रमांद्वारे संस्थांनी शेतकरी, महिला, उद्योजक, दिव्यांग, कलाकार, आणि स्थानिक उत्पादक यांना व्यासपीठ मिळवून दिले आहे.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये:
विविध श्रेणीतील स्टॉल्स: ग्रामीण तसेच स्थानिक उत्पादने, सेंद्रिय शेतीच्या वस्तू, पारंपरिक व पर्यावरण पूरक वस्तू, बचत गटांचे उपक्रम, स्वनिर्मित वस्तू यांचे प्रदर्शन.
विशेष उपक्रम: कौशल्य विकास कार्यक्रम, नावीन्यपूर्ण स्पर्धा, CSR आणि दाते यांच्यासोबत जोडणारे उपक्रम.
कला दालने: बांबू आर्ट, गोंडी आर्ट, माती काम, कचऱ्यातून तयार केलेल्या कलाकृती यांचे आकर्षण.
ई-वेस्ट कलेक्शन: जुने कपडे व साड्या गोळा करून त्यापासून पिशव्या तयार केल्या जातात.
सरकारी योजनांची माहिती: सरकारी उपक्रमांविषयी जागरूकता निर्माण करणारे स्टॉल्स.
उद्योजकांसाठी सुवर्णसंधी:
हे प्रदर्शन नोकरीच्या अपेक्षेने न राहता स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्या उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी हे व्यासपीठ उपयोगी ठरेल.
स्टॉल बुकिंग सुरू:
ग्रामायण प्रतिष्ठानने उद्योजकांना प्रदर्शनात स्टॉल बुक करून सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
संपर्क:
9822942203
9422443870
9665054508