अपघातातून बरे होत नाही तोच पुन्हा अपघात; राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचे निधन

0
NCP Leader Tukaram Bidkar Killed In Road Accident In Maharashtra’s Akola

राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन

अकोला – विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. तुकाराम बिडकर यांचा काही महिन्यापूर्वीच एक अपघात झाला होता. मुंबईत उपचार करुन ते बरेही झाले होते. आज (13 फेब्रुवारी) अपघातात निधन झाल्याचे वृत्त हाती आले आहे.

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी आमदार तथा वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉइंट जवळ दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात तुकाराम बिरकडयांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मालवाहू टाटा वाहनाने बिरकड यांच्या दुचाकी वाहनाला दिलेल्या जबरदस्त धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने स्थानिक खासगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. धडक देणारे मालवाहू वाहन हे गुरांची वाहतूक करीत असल्याने काही पोलिस त्या वाहनाचा पाठलाग करीत होते. तेव्हा या वाहनचालकाने आपले वाहन वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच हा दुर्दैवी अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, तीन महिन्यांपूर्वीही प्रा. बिडकर अपघातग्रस्त झाले होते. त्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते आणि अकोल्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रा. तुकाराम बिडकर हे आपल्या निवासस्थानाहून जठारपेठ येथे जात असताना त्यांच्या एक्टिवा दुचाकीला मागून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मुंबईत उपचार करुन ते बरेही झाले होते. ज्यादिवशी त्यांना रुग्णालयातून सुटी झाली, त्याचदिवशी अकोल्याला जाताना मला मंत्रालयात आवर्जून भेटायला आले होते. अगदी गेल्या आठवड्यात सुद्धा ते काही कामासाठी मंत्रालयात भेटण्यासाठी आले होते. आज काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि ते आपल्यातून निघून गेले, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

दरम्यान, 11 वर्षांपूर्वी प्रा. तुकाराम बिडकर यांचे स्वीय सहायक व निकटवर्तीय ज्ञानेश्वर श्रीकृष्ण वानखडे यांची भरदिवसा धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. या घटनेने त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. प्रा. तुकाराम बिडकर यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. विदर्भाच्या विकासासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या निधनामुळे विदर्भातील राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.