
यवतमाळ- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने यवतमाळच्या संविधान चौकात सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. सरकार विरोधात जोरदार घोषणबाजी करत हे आंदोलन झाले. आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीची चौकशी सुरू आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने केली जात आहे.
आमदार रोहित पवार यांनी शेतकरी बेरोजगार युवक सामान्य नागरिकांचे प्रश्न यासंदर्भात युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती. मात्र, सरकार दडपशाहीने ईडीचा धाक दाखवून आमदार रोहित पवारांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा वर्षा निकम यांनी केला.