Home Top News कोकण, विदर्भात पुढचे पाच दिवस पावसाचे

कोकण, विदर्भात पुढचे पाच दिवस पावसाचे

0

मुंबई: कोकणातील रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील बहुतांश जिह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे, तर काही भागात अतिवृष्ठी झाली आहे.

विदर्भासाठी पुढचे पाच दिवस पावसाचे मुसळधार पावसाचे आहेत. अमरावती, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. Maharashtra Rain Update

उत्तर महाराष्ट्रात देखील आज धुव्वाधार पावसाचा अंदाज आहे. जळगाव साठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकटांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुण्यातील घाट परिसरात आज अतिवृष्टीचा इशारा कायम असून कोल्हापूर तसेच साताऱ्यातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज तर मुंबईसाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.