राज्यात तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. तर काही नद्यांनी पाण्याची धोकादायक पातळी ओलांडली आहे. रायगड,रत्नागीरी, सिंधुदुर्गमध्ये पुढचे पाचही दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर पालघर ठाण्यासाठी आजही ऑरेंज अलर्ट कामय आहे.
विदर्भासाठी पुढचे पाच दिवस पावसाचे मुसळधार पावसाचे आहेत. अमरावती, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. Maharashtra Rain Update
उत्तर महाराष्ट्रात देखील आज धुव्वाधार पावसाचा अंदाज आहे. जळगाव साठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकटांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुण्यातील घाट परिसरात आज अतिवृष्टीचा इशारा कायम असून कोल्हापूर तसेच साताऱ्यातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज तर मुंबईसाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.