Home Top News नितीशकुमार पुन्हा जेडीयूचे अध्यक्ष

नितीशकुमार पुन्हा जेडीयूचे अध्यक्ष

0

पाटणा- जनता दल युनायटेडचे अध्यक्ष लल्लन सिंह उर्फ राजीव रंजन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. मागील काही दिवसांपासून जेडीयूमध्ये नेतृत्वबदलाची चर्चा सुरु होती. जेडीयूच्या पोस्टर्सवरुन अध्यक्ष लल्लन सिंह यांचा फोटो नसल्याने वाद निर्माण झाला होता. आता नितीशकुमार यांनी स्वतःकडे पक्षाची सूत्रे घेतली आहेत.

लल्लन सिंह ऊर्फ राजीव रंजन यांनी जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आपला राजीनामा सादर केला. त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केला व त्यानंतर नितीश कुमार यांची पुन्हा एकदा जेडीयूच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. (Nitish Kumar became JDU President) जदयूमध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक जण पुन्हा एनडीएत जाण्यास इच्छूक असल्याची माहिती आहे.