नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

0

बिहारमध्ये मोठा राजकीय बदल झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले आहेत. नितीश कुमार यांनी आज 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. Nitish Kumar 

पाटणा येथील राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत भाजपच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. त्यात सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचा समावेश आहे.