वय कितीही असलं तरी दिसलं नाही पाहिजे

0

– प्रणिती शिंदे (Praniti Shinde)
सोलापूर, 4 ऑगस्ट येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश तुम्हालाच मिळेल, हीच एका काँग्रेसच्या लाडक्या बहिणीकडून शुभेच्छा असल्याचे मत सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (MP Praniti Shinde)यांनी व्यक्त केलं. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात प्रणिती शिंदे बोलत होत्या.

वय कितीही असलं तरी दिसलं नाही पाहिजे. पहाटे लवकर उठणं, शाकाहारी खाणे आणि लवकर झोपणे हेच त्यांच्या तरुणपणाचं कारण असावं असावं असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

काही लोकांच्यामुळं मागच्या वेळी चूक झाली होती. पण ती चूक दुरुस्त करुन तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये परत आल्याचे शिंदे म्हणाल्या. पुढच्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.

पहाटे लवकर उठणं, शाकाहारी खाणे आणि लवकर झोपने हेच त्यांच्या तरुणपणाचं कारण असावं असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. साहेब आणि माझ्यामध्ये फरक असल्याचे तुम्ही म्हणालात. कारण शिंदे साहेबांनी आम्हा सर्वांपेक्षा ही तुमच्यावर दुप्पट प्रेम केल्याचे शिंदे म्हणाल्या.

संसदेत गेल्यावर अनेक जण म्हणतात की तुम्ही शिंदे साहेबांची मुलगी आहे का? असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा