‘या’नदीच्या पूरात युवक गेला वाहून

0

नाशिक (nashik), 4 ऑगस्ट नाशिक जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने इगतपुरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, तर सुरगाणा परिसरामध्ये जवळपास चार गावांचा संपर्क हात तुटला आहे. यावर्षी प्रथमच गोदावरी नदीला पूर आलेला आहे. दरम्यान दुपारी पर्यटक होऊन आलेल्या २९ वर्षीय युवकाला रामकुंड येथे पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला आहे त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

जून महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली पण जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसाने नाशिक मध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. सातत्याने इगतपुरी त्रंबक सुरगाणा व लगतच्या परिसरामध्ये होत असलेल्या पावसामुळे त्याचबरोबर धरण क्षेत्रामध्ये सातत्याने होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे हे भरून वाद आहे.

जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सुरगाणा तालुक्यातील अलुंगण ,उंबरविहीर, जामुन माथा ,यासह काही गावांचा संपर्क तुटला आहे या ठिकाणी मागील दोन दिवसापासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तर सुरगाणा तालुक्यातील गहला या गावाच्या नदीमध्ये नदी ओलांडत असताना मंगला अमृत बागुल ही महिला वाहून गेली तिचा मृतदेह आज सापडला असून तिला वैद्यकीय तपासून नंतर मृत घोषित करण्यात आलेले आहे.

सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळी मध्ये देखील सुधारणा झालेली असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण हे जवळपास 75 टक्के च्या पुढे भरल्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे दुपारी बारा वाजता 521 आणि तीन वाजता 1 हजार पाणी या धरणातून गोदावरी नदी पत्रामध्ये सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे नाशिक शहराच्या मध्यभागातून वाहणारी गोदावरी नदीला पूर आला असून गोदावरी नदी लगत असलेले लहान मंदिरे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत.

दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे तर इगतपुरी तालुक्यातील भाम नदीतून पाण्याच्या विसर्ग केल्यानंतर या परिसरात असलेले सहा घरांमध्ये पाणी साचले होते आणि त्यानंतर तातडीने प्रशासनाच्या वतीने रिस्की ऑपरेशन करून या घरामध्ये असलेल्या सर्व नागरिकांना वाचविण्यात आले आहे अशी माहिती नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिलेले आहे.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरणातून 22966 बाहुली धरणातून 1821 कडबा धरणातून आठ हजार 298 भाम धरणातून 5 हजार 920 पालखेड धरणातून 5 हजार 570 नांदूरमधेमेश्वर धरणातून 44 हजार 768 इतका पाणीसाठा हा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे. यामुळे गोदावरी काठी राहणाऱ्या सर्व नागरिकांना सावधानतेच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आले असून अजून पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आलेली आहे

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा