
एल्गोरिदमला ब्रेक! जर्मनीत मुलांसाठी वेगळ्या ‘यंग व्हर्जन’ची मागणी
जर्मनी मध्ये सत्ताधारी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी (SPD) मधील काही नेत्यांनी आपल्या आघाडीतील सहयोगी पक्षांसोबत मिळून मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की १४ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्याची परवानगी देऊ नये. जर्मनीत मुलांवर सोशल मीडियाच्या होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चर्चा तीव्र झाली असून, त्यामुळे सरकारवर ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर फेसबुक, स्नॅपचॅट, टिकटॉक आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर मुलांची प्रवेशमर्यादा निश्चित करण्यासाठी दबाव वाढत आहे.
SPD च्या खासदार आणि नेत्यांनी मांडलेल्या प्रस्तावात १४ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया पूर्णपणे बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच १४ ते १६ वयोगटातील मुलांसाठी सोशल मीडियाचे स्वतंत्र ‘यंग व्हर्जन’ तयार करण्याचा प्रस्ताव आहे. या यंग व्हर्जनमध्ये अल्गोरिदमवर आधारित फीड किंवा वैयक्तिक आवडीनुसार दाखवली जाणारी सामग्री नसेल. याशिवाय, सतत स्क्रोल करण्याची सुविधा आणि आपोआप व्हिडिओ सुरू होण्यासारख्या वैशिष्ट्यांनाही बंदी घालण्यात येईल.
या प्रस्तावात १६ वर्षांवरील सर्व वापरकर्त्यांसाठी अल्गोरिदम-आधारित शिफारसी (रिकमेंडेशन सिस्टम) डीफॉल्ट स्वरूपात बंद ठेवण्याचा पर्याय देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
![]()















