Home LOCAL NEWS ३९६ व्या शिवजयंती निमित्त महाराष्ट्र मंडळाला महाराजांचा आकर्षक पुतळा भेट

३९६ व्या शिवजयंती निमित्त महाराष्ट्र मंडळाला महाराजांचा आकर्षक पुतळा भेट

0

वाडी नगर परिषदचे नगरसेवक हर्षल काकडे व नगरसेविका पूर्वा हर्षल काकडे यांच्या तर्फे पुतळा पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

नागपूर(Nagpur):आता येणाऱ्या १९ फेब्रुवारी २०२६ ला आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वि जयंती असल्या निमित्ताने औचित्य साधत वाडी नगर परिषदचे नगरसेवक हर्षल काकडे व नगरसेविका पूर्वा हर्षल काकडे यांच्या तर्फे डिफेन्स परिसरातील महाराष्ट्र मंडळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आकर्षक पुतळा भेट देण्यात आला.
हा पुतळा मातृतुल्य मालतीताई शिंदे व मोठे बंधू विजयजी शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. शिवजयंतीच्या पावन निमित्ताने देण्यात आलेली ही भेट मंडळासाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद ठरली, व त्यांची हि भेट शिवाजी महाराजांनी जसे चांगले कर्तृत्व केले आहे तसे आम्ही सगळ्यांनी केले पाहिजे असे दिसून येते. शिवरायांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि परिसरातील वातावरण शिवमय व्हावे, हा या भेटीमागचा मुख्य उद्देश आहे.


शिवजयंतीच्या पावन पर्वावर मिळालेली ही भेट महाराष्ट्र मंडळासाठी केवळ एक वस्तू नसून ती प्रेरणा आणि अभिमानाचे प्रतीक ठरली आहे. “शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्वराज्याची स्थापना करून आपल्या कर्तृत्वाने इतिहास घडवला, तसाच आदर्श समोर ठेवून आपण सर्वांनी समाजहित जोपासले पाहिजे आणि उत्तुंग कार्य केले पाहिजे,” असा संदेश या उपक्रमातून काकडे परिवाराने दिला आहे.
याप्रसंगी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हर्षल काकडे आणि पूर्वा काकडे यांचे आभार मानले. हा पुतळा डिफेन्स परिसरातील नागरिकांसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव स्फूर्तीस्थान ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.