Home LOCAL NEWS आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 15 मार्च रोजी श्री संताजी तेली समाज बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने...

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 15 मार्च रोजी श्री संताजी तेली समाज बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन

0

नागपूर (14 मार्च) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 15 मार्च 2026 रोजी श्री संताजी तेली समाज बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन दुपारी 4 वाजता रुची हॉल,बेलतरोडी रोड,नागपूर येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्री संताजी स्वामिनी तेली समाज सखी ग्रुपच्या महिला कार्यकर्त्या कार्यकारणीच्या माध्यमातून आयोजित केला जात आहे.

सन 2019 मध्ये स्थापन झालेल्या श्री संताजी तेली समाज बहुउद्देशीय संस्थेला यांना आठ वर्षे पूर्ण होत आहेत. बेसा बेलतरोडी येथील संस्थेमध्ये गेल्या सहा वर्षापासून महिला कार्यकर्त्या सक्रियपणे कार्यरत आहेत. संस्थेमार्फत पुरुष व महिला कार्यकर्त्यांच्या सहकार्याने समाजातील विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये श्री संताजी जगनाडे महाराजांचे पुण्यतिथी, महिलांसाठी मकर संक्रांति निमित्त हळदीकुंकवाचे आयोजन, जागतिक महिला दिवस, कोजागिरी चा कार्यक्रम असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून कार्यक्रम पार पाडले जातात.

श्री संताजी स्वामिनी तेली समाज सखी ग्रुपच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जात आहे तसेच महिला कार्यकारणी ने समाजातील महिलांना एकत्र आणून त्यांच्या प्रगतीसाठी व कौशल्य विकासासाठी काही उपक्रम राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून झाशीची राणी भिशी ग्रुप तयार करण्यात आला असून दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी महिलांशी संवाद साधून त्यांच्या सहभागातून या भिशीचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आगामी 15 मार्च 2026 रोजी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये महिलांच्या सक्षमीकरणा संदर्भात मार्गदर्शन, महिलांकरता विविध स्पर्धा, आकर्षक बक्षिसे तसेच मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

तरी बेसा – बेलतरोडी, मनीष नगर परिसरातील तेली समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन संस्थेच्या कोअर कमिटीच्या वतीने महिला कार्यकारिणी ग्रुपच्या तर्फे करण्यात येत आहे.

संस्थेतील कार्यकारी पुरुष यांचे नाव

अजयभाऊ गोल्हर, संजयजी ईटनकर, कृष्णाजी गोल्हर, राजेंद्रजी बावनकुळे, राजेशराव रेवतकर, पुरुषोत्तमजी बावनकुळे, राजेशराव राऊत, रमेशजी तळवेकर

श्री संताजी स्वामिनी तेली समाज सखी कोर कमिटीतील महिला सदस्य

अश्विनी देवगडे, संगीता पोटदुखे, श्वेता साठवणे, भाग्यश्री पोटदुखे, भारती वैद्य, सीमा भोंगाडे, उज्वला गुल्हाने

कार्यक्रमात पाठिंबा देणाऱ्या महिलांची नावे

विभा लोखंडे, स्वाती लांजेवार, सुवर्णा डांगरे, प्रतिभाताई काटोके, किरण दांडेकर.