ऐबेकस व वैदिक मॅथ्स स्पर्धेचे आयोजन

0

नागपूर -महाराष्ट्र ऐबेकस असोशिएशन ‘तर्फे ऐबेकस व वैदिक मॅथ्स स्पर्धेचे आयोजन नुकतेच गोडवाना विकास मंडळ, नागपूर येथे पार पडले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात प्रामुख्याने जिल्हा नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम हिंगोली, ठाणे जळगाव, सातारा, पुणे येथील विदयार्थी सहभागी झाले होते.
यात, कु. पारूल धनंजय ढगे हिने, ऐबेकस लेव्हल 3 या गटात प्रथम येऊन ” चेंपीयन ओफ चेंपीयन ” हे पारितोषिक पटकावले.
स्पर्धेचे आयोजन ऐबेकस नागपूरतर्फे चाईल्ड वर्ल्ड – न्यू सुभेदार नागपूर, च्या संचालिका, शुभागी हेडाऊ, यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिजीत मुळे, नागपूर यांनी तर आभार, शिफा अतार, सातारा यांनी मानले.