राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे

0

 

नागपूर  NAGPUR – निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह हे कोणाचे आहे यावर आज निर्णय दिला असून हा निर्णय अजित पवार  AJIT PAWAR गटाच्या बाजूने गेला आहे त्यामुळे आज शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून ढोल वाजवत जल्लोष साजरा केला आहे

शरद पवार गटाने आता नव्या नाव आणि चिन्हासाठी धडपड सुरू केली आहे. NCP राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पक्ष व चिन्ह मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर बारामती,ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. नागपुरात बजाजनगर कार्यालयासमोर उद्या बुधवारी 12 वाजता शहर अध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा केला जाणार आहे.दरम्यान, हा निकाल आम्हाला अनपेक्षित होता, हा शरद पवारांवर अन्याय आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ असे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खा प्रफुल्ल पटेल यांनी या निर्णयाचे स्वागत केले तर विदर्भातील शरद पवार गटाचे नेते माजी,गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही तर लोकशाहीची हत्याच असल्याचे म्हटले आहे.