Home Breaking news काटोल तालुक्यात परसोडी शाळेची इमारत कोसळली

काटोल तालुक्यात परसोडी शाळेची इमारत कोसळली

0
विद्यार्थी नसल्याने जीवितहानी टळली
आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या कार्यक्षेत्रातील घटना
“जीर्ण शाळा कोसळली, मोठी दुर्घटना थोडक्यात टळली”
काटोल तालुका मधील परसोडीतील शाळा कोसळून सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह”

काटोल: नागपूर जिल्ह्यातील परसोडी (बुवा) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. काल दुपारी शाळेचा पुढील भाग आणि भिंती कोसळल्याने परिसरात विटांचा ढिगारा साचला. सुदैवाने त्या वेळी विद्यार्थी उपस्थित नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. या घटनेबाबत सरपंच कमलेश डोईजड यांनी माहिती दिली.

शाळेची इमारत जुनी व जीर्ण अवस्थेत असल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने दुरुस्ती किंवा नवीन इमारत उभारण्याची मागणी केली आहे. ही घटना आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या कार्यक्षेत्रात घडल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, काटोल