पिकअप वाहन उलटले 35 मजूर जखमी

0

(Gondia)गोंदिया– मजूर पुरुष- महिलांना घेऊन जाणारा पिकअप छोटा हत्ती उलतल्याने 35 महिला आणि पुरुष जखमी झाल्याची घटना देवरी तालुक्यातील (Shilapur)शिलापूर येथे घडली. गोंदिया जिल्ह्यात दमदार पाऊस पडल्यामुळे शेतकरी हे शेतीच्या कामाकडे वळले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व धान बिजाची रोवणी केली आहे व पाण्याचे साधन आहे अशा धानपीक हे रोवणीसाठी तयार झालेलं आहे. याच रोवणीच्या कामाकरिता मोठ्या प्रमाणामध्ये मजूर लागत असतात. यातील 14 महिला अतिगंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलेले आहे आणि उर्वरित महिलांवर उपजिल्हा रुग्णालय देवरी येथे उपचार सुरू आहे. अनेक महिला आणि पुरुषांना गंभीर जखमा झाल्या असून हात, पाय, खांदे फ्रॅक्चर झाले आहेत. आता तरी प्रशासन याकडे लक्ष देऊन अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीवर आळा घालेल, हीच अपेक्षा आता नागरिक करत आहेत.