जुलैमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार-देवेंद्र फडणवीस

0

छत्रपती संभाजीनगर-राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती (DCM Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (State Cabinet expansion in July) दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. (Devendra Fadnavis)देवेंद्र फडणवीस सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती दिली. काल गुरुवारी शिंदे व फडणवीस यांनी दिल्ली येथे (Union Home Minister Amit Shah)केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचेही सूत्र ठरल्याची माहिती आहे.
प्रसार माध्यमांसी बोलताना देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठीच काल दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. याशिवाय आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करायचा आहे. (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. जुलैमध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू, असे फडणवीस म्हणाले. काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा फडणवीस यांनी फेटाळल्या. केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, हे आम्हाला माहिती नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.