माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रूग्णालयात दाखल

0

 

पुणे, (Pune)14 मार्च,  देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Former President Pratibhatai Patil) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या डॉक्टरांकडून प्रतिभाताई पाटील यांच्यावर उपचार सुरू आहे. प्रतिभाताई पाटील यांचे वय ८९ वर्ष इतके आहे. प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. २००७ ते २०१२ त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बरी नाही. काल बुधवारीअधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं.

 

डॉक्टरांनी प्रतिभाताईंवर उपचार सुरू केले आहेत. कायदेतज्ज्ञ असलेल्या प्रतिभाताई पाटील जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. नंतर त्या एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या. पहिल्यांदाच मंत्री आणि त्यानंतर सतत २० वर्षे त्यांनी निरनिराळ्या खात्याची मंत्रीपदे सांभाळली.