ग्रामायण प्रदर्शनात रांगोळी, निबंध आणि ज्येष्ठ गटातील निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

0
ग्रामायण प्रदर्शनात रांगोळी, निबंध आणि ज्येष्ठ गटातील निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
ग्रामायण प्रदर्शनात रांगोळी, निबंध आणि ज्येष्ठ गटातील निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

अश्विनी कुलकर्णी यांना निबंध स्पर्धेत दोन्ही गटात पुरस्कार

नागपूर (Nagpur) (१७ जानेवारी २०२५) : ग्रामायण प्रदर्शनच्या निमित्ताने आयोजित रांगोळी स्पर्धा, खुल्या आणि ज्येष्ठ गटातील निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा ग्रामायणचे अध्यक्ष अनिल सांबरे आणि प्रमुख पाहुण्या प्राचार्य डॉ. स्वाती धर्माधिकारी यांच्या हस्ते पार पडला.अश्विनी कुलकर्णी यांना निबंध स्पर्धेत दोन्ही गटात पुरस्कार मिळाला, हे उल्लेखनीय. विशेष म्हणजे, पुणे आणि खामगाव येथून देखील स्पर्धक सहभागी झाले होते. 

६वे ग्रामायण उद्यम प्रदर्शन १६ ते २० जानेवारी २०२५ दरम्यान नागपूरच्या अमृत भवन, आंध्र असोसिएशन परिसर, उत्तर अंबाझरी मार्ग, झाशी राणी चौकाजवळ आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळे १७ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाले. ग्रामायण प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित रांगोळी स्पर्धा, खुल्या गटातील निबंध स्पर्धा आणि ज्येष्ठ गटातील निबंध स्पर्धेतील परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

नेहा मुंजे आणि आरती जुमळे यांनी रांगोळी स्पर्धेच्या परीक्षक म्हणून आपली भूमिका पार पाडली. त्यांनी स्पर्धेतील विविध कलात्मक आणि सर्जनशील रांगोळ्यांचे कौतुक केले आणि कलाकारांची मेहनत व कलेची पातळी मांडली.

सुनील शिनखेडे आणि स्मिता खोटे यांनी खुल्या गटातील निबंध स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांनी सहभागींनी व्यक्त केलेल्या विचारांची गहनता आणि विषयावरील लेखन कौशल्यावर अभिप्राय दिला.

ज्योती आगवन आणि मंगला देशपांडे यांनी ज्येष्ठ गटातील निबंध स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या लेखनातून आलेल्या जीवन अनुभवांचा आदर व्यक्त केला आणि त्यांच्या विचारांच्या गूढतेवर मनोगत व्यक्त केले. या परीक्षकांनी स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येकाचा सन्मान करण्यात आलाआणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली, तसेच उत्तम लेखन व कलेच्या प्रोत्साहनासाठी मार्गदर्शन केले.

– पुरस्कार विजेते

रांगोळी स्पर्धेत प्रथम पुरस्कार विशाखा प्रमोद करंदीकर, द्वितीय पुरस्कार रंजना विजय म्हसकर, तृतीय पुरस्कार दिपाली संजय पिदडी, प्रोत्साहन पुरस्कार छाया प्रभाकर पोईनकर, मीनाक्षी मनोज मसनेवार यांना देण्यात आला. 

खुल्या गटातील निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्रतिमा सहस्रबुद्धे, द्वितीय पुरस्कार: अनुराधा पाठक, तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आला. यात अश्विनी अनिल कुलकर्णी, वंदना धर्माधिकारी, प्रोत्साहन पुरस्कारात मेघा अविनाश कुलकर्णी, विवेक कुलकर्णी यांना देण्यात आला.  

ज्येष्ठ गटातील निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार अश्विनी कुलकर्णी, द्वितीय पुरस्कार महिलांमधून प्रथम विशाखा मोरोणे, द्वितीय मंजू नवघरे, पुरुषांमधून प्रथम राजेंद्र गुर्जर (तळेगाव, पुणे), द्वितीय: अरुण खटी (नागपूर) यांना देण्यात आला. या कार्यक्रमाने ग्रामायण उद्यम प्रदर्शनात सर्व वयोगटातील सहभागी आणि विजेत्यांना पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

Nagpur is famous for
Nagpur map
NMC Nagpur
Nagpur in which state of India
Nagpur city population
Nagpur city area in sq km
nagpur.gov.in application form
Nagpur in which state in Map