
चंद्रपूर – महाराष्ट्रातील बलाढ्य शिक्षक संघटना असलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे ‘प्रांतीय अधिवेशन ३ व ४ फेब्रुवारी रोजी शकुंतला फार्मस् (लिली) चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रांतीय अधिवेशनात शिक्षकांच्या ज्वलंत समस्यांवर चर्चा करण्यात येत आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत सक्रीय पाठिंबा देणाऱ्या शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आमसभा, स्मरणिका प्रकाशन समारंभ होईल. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय प्रांतीय अधिवेशनास विदर्भातून शिक्षकांची उपस्थिती असल्याची माहिती आ सुधाकर अडबाले, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेते यांनी दिली.