
(Amravti)अमरावती – अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे रिपाइं गवई गटाचे नेते डॉ राजेंद्र गवई यांनी कार्यकर्ता मेळावा घेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी रिपाइं गवई गटाचे नेते (Rajendra Gavai) राजेंद्र गवई आग्रही असून मला महाविकास आघाडीने उमेदवारी द्यावी नाही तर अमरावती लोकसभेचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर ठेवू व माविआचा उमेदवार पाडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
रिपब्लिकन एक्य आताही होऊ शकते, या रिपब्लिकन ऐक्याचं अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हावं, तर रामदास आठवले व जोगेंद्र कवाडे यांना मी तयार करतो, अशी भूमिका राजेंद्र गवई यांनी मांडली. दरम्यान राजेंद्र गवई यांनी आज अमरावती लोकसभा निवडणुकीबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच टेंशन वाढलं असून पुढे राजेंद्र गवई काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागलं आहे.