भोजपुरी अभिनेता रवी किशन यांची सोमवारी बल्लारपूर आणि दुर्गापूरमध्ये जाहीर सभा

0

बल्लारपूर : विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सोमवारी ११ नोव्हेंबर २०२४ रोजी भोजपुरी चित्रपट अभिनेते व खासदार रवी किशन यांची जाहीर सभा बल्लारपूर आणि दुर्गापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. बल्लारपूर आणि दुर्गापूरमध्ये जाहीर सभेला भाजपाचे स्टार प्रचारक माजी खासदार अशोक नेते उपस्थित राहणार आहे.*

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ करणार संबोधित

आपल्या दमदार अभिनयाने भोजपुरी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये छाप सोडणारे खासदार रवी किशन यांचा सोमवारी ११ नोव्हेंबरला दुपारी ३.०० वाजता बल्लारपूर येथे रोड शो गोल पुलिया पासून हेल्थ क्लब ग्राउंड पर्यंत आणि त्यानंतर सायंकाळी ४.०० वाजता डब्लूसीएल हेल्थ क्लब ग्राउंड येथे जाहिर सभेला मार्गदर्शन करतील. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता दुर्गापूर येथे भव्य रोड शो नंतर लालचौक येथे सायंकाळी ६.३० वाजता जाहिर सभेतून नागरिकांशी संवाद साधतील.

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाला अधिक गती प्राप्त झाली आहे. बल्लारपूर विधानसभेचा चेहरामोहरा बदलला असून यापुढेही अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खासदार रवी किशन यांच्या जाहीर सभेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले आहे.