अमरावती – देशातील निर्भया हत्याकांडानंतर केंद्र शासनाने महिलांसाठी खास “सखी” निवारा केंद्र सुरू केले. या सखी केंद्राच्या माध्यमातून पीडित महिलांचे समुपदेशन केले जाते. यासोबतच त्यांच्या निवासाची देखील व्यवस्था केली जाते. 2017 नंतर प्रत्येक जिल्ह्यात एक सखी निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. या सखी केंद्रामार्फत पीडित महिला, मुली, अल्पवयीन मुलीचे समुपदेशन केले जाते. अमरावतीत डफरीन रुग्णालयात हे सखी संकटग्रस्त महिला निवारा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत 2017 ते 2022 पर्यंत 181 पीडितांचे समुपदेशन करण्यात आले. गेल्या वर्षभरात 105 पीडितांचे समुपदेशन करण्यात आले आहे. या सखी केंद्रामार्फत समुपदेशनासोबतच पीडित महिलांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येते. यासोबतच स्वयंरोजगार देखील उपलब्ध करून देण्यात येतो अशी माहिती व्यवस्थापक ॲड. मीना नर्मोडे, संघरत्न नन्नावरे, संस्था अध्यक्ष अमरावती यांनी दिली