तर ग्रामपंचायतही निवडून येऊ शकत नाही !

0

राऊत यांचा दावा

धुळे DHULE : दिल्लीचे राज्य 2024 साली आपल्या हातात येत असल्याच्या अविर्भावात सारे वागत असले तरी हा मोदींचा विजय नसून हा ईव्हीएम मशीनचा विजय आहे. ईव्हीएम मशीनच्या विरोधात विविध देश रस्त्यावर उतरले आहेत, बांगलादेश नंतर आता भारताचा नंबरअसून मतपत्रिकेने निवडणुका घेतल्यास भाजप धुळ्याची ग्रामपंचायत सुद्धा जिंकू शकत नाही असा दावा शिवसेना नेते खा संजय राऊत SANJAY RAUT  यांनी केला आहे.

22 जानेवारी रोजी अयोध्येत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत करण्यात आले आहे, परंतु आम्ही अयोध्येत न जाता नाशिक येथे उद्धव ठाकरे  Uddhav Thackeray यांच्या उपस्थितीत राम मंदिरासाठी लढा देत असताना शहीद झालेल्या सर्वच स्तरातील शहिदांना अभिवादन करीत उत्तर महाराष्ट्रातील झंजावाताला सुरुवात करणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी धुळ्यात स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काळाराम मंदिर येथे दर्शनानंतर गोदातीरावर महाआरतीचे देखील आयोजन यावेळी 22 जानेवारी रोजी करण्यात आले असल्याचे देखील राऊत यांनी स्पष्ट केले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वगृही परतणाऱ्या इच्छुकांना पक्षात घेणार नसल्याची स्पष्ट भूमिका राऊत यांनी व्यक्त केली असून, त्यांना आम्ही उमेदवारी दिल्याचा पश्चाताप होत असल्याची खंत देखील राऊत यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
आकडा वाढवायचा म्हणून फक्त निवडणुका लढणार नाही अशी भूमिका महाविकास आघाडीतर्फे घेतली जाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले असून, राज्यातील जवळपास 23 जागांवर शिवसेना ही कायम लढत आली असून 23 मतदारसंघांमध्ये शिवसेनेची पकड कायम आहे, परंतु जिंकलेल्या 18 जागा आमच्या कायम राहतील असा विश्वास देखील यावेळी राऊत यांनी व्यक्त केला आहे.

गिरीश महाजन यांनी पुढील काही दिवसात मोठा राजकीय भूकंप होईल असं वक्तव्य केले या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेत त्या भूकंपात तेच गाडले जातील या शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
शिंदे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही सत्तेला लाथ मारली, एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेत बाळासाहेबांचा विचार हा दिल्लीचा गुलाम कधीच झालेला नव्हता, असे म्हणत संजय राऊत यांनी अजित पवार गट व शिंदे गट शिवसेनेच्या जागा वाटपाचा निर्णय देखील दिल्लीत घेतला जाणार असून, दिल्लीतील भाजपच्या हाय कमांडच्या हिरवळीवर त्यांना बसावे लागत असल्याचा दावा केला. तुम्ही सांगाल ती निवडणूक ईव्हीएम शिवाय घेऊन दाखवा वाराणसीची घ्या, गुजरातची घ्या नागपूरची घेऊन दाखवा, गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर ची निवडणूक घेऊन दाखवा, ही ईव्हीएमची दादागिरी आम्ही मोडून काढू असा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी दिला.