जे ठरणार ते तीन पक्षाच्या नेत्यांमध्येच!

0

 

खासदार तुमाने यांचा दावा

NAGPUR नागपूर भाजपचा विदर्भातील 10 जागावर दावा असल्याबाबत छेडले असता तिन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते बसून निर्णय घेतील. अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून यासंदर्भात निर्णय घेतील. जे काही ठरलं असेल तीन नेत्यांमध्ये पूर्वीच ठरले असल्याचा दावा रामटेकचे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने KRUPAL TUMANE यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे. मुख्यमंत्री दिल्ली दौरा संदर्भात ते म्हणाले,केंद्र सरकारकडून राज्याला अनेक प्रकल्पांसाठी निधी मिळत असतो. ते घेण्यासाठी मुख्यमंत्री EKNATH SHINDE  एकनाथ शिंदे यांना सतत दिल्लीला जावं लागतं. केंद्राकडून करोडो रुपयांचे काम केंद्राकडून मंजूर करून आणले आहे.

 

दरम्यान, शिवसंकल्प अभियानात रामटेक आणि वाशिम मतदारसंघ वगळण्यात आले आहेत याबाबतीत बोलताना शिवसंकल्प यात्रा पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी होत आहे. त्यानंतर 27-28 जानेवारीलाला शिंदे गट शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये शिवसंकल्प अभियानाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. पहिल्या दहा मतदारसंघांमध्ये दोन सभा झाल्या आहे. दुसरा टप्पा हा 2 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात रामटेक यवतमाळ, वाशिम, ठाणे, मुंबई, पालघर आणि कल्याण या ठिकाणी शिवसंकल्प अभियान होणार आहे. विरोधी गटाला काही काम उरलेले नाही त्यामुळे ते उगीचच टीका करतात असे स्पष्ट केले.