नवी दिल्ली ( NEW DELHI ) – २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ( BJP) भाजप प्रणित एनडीएचा सर्वात मोठा पराभव महाराष्ट्रात होईल व इतर राज्यांतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल, असा दावा ( Uddhav Balasaheb Thackeray ) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut on NDA) यांनी केला आहे. महाराष्ट्रातील त्यांचे सरकारही लवकरच उलथे पडेल, असा दावाही त्यांनी केला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आज NDA एनडीएची बैठक होणार असून पंतप्रधान मोदी या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. हा धागा पकडून राऊतांनी भाजप व एनडीए वर निशाणा साधला.
राऊत म्हणाले की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काय होईल? याबाबत भाजपला विश्वास राहीलेला नाही. त्यामुळे आता पक्ष फोडण्याचे राजकारण सुरु आहेे. एनडीएची आठवण भाजपला झाली आहे. मात्र, आता भाजपने कितीही प्रयत्न केला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा मोठा पराभव होईल. महाराष्ट्राप्रमाणेच बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, तेलंगणातही एनडीएचा मोठा पराभव होईल, असे राऊत म्हणाले.