– सोहळ्याचे यंदा नववे वर्ष
– शेकडो भाविकांची राहणार उपस्थिती
– किमया विशेषांक आता डिजिटल स्वरूपात
नागपूर (NAGPUR ) : नाथ संप्रदायातील संतसज्जनांनी आपल्याला दिलेला अमूल्य ठेवा म्हणजे शाबरी कवच! शाबरी कवच हा बीजमंत्रांचा समूह असून, कवचाच्या नियमित पठणाचे अद्भुत परिणाम अनेकांनी अनुभवले आहेत. श्री मुकुंद ( Shri Mukund Dada Andhare ) दादा अंधारे नवनाथ शक्तीपीठ ट्रस्टच्या वतीने, दरवर्षी शाबरी कवच सहस्त्रावर्तन सोहळ्याचे आयोजन केले जाते. देशाच्या विविध भागांमधून भाविक या उपक्रमात सहभागी होतात. ज्या भाविकांना सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, ते ऑनलाईन माध्यमातून या आयोजनाचा लाभ घेतात. (Shabri Kavach)
श्री मुकुंद दादा अंधारे नवनाथ शक्तीपीठ ट्रस्टच्या वतीने, यंदा शाबरी नवच सहस्त्रावर्तन सोहळा वर्धा रोडवरील कर्वेनगरस्थित विकासाश्रम येथे आयोजिण्यात आला आहे. गुरूवार १७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सुरू होणाèया या कार्यक्रमाचा समारोप शाबरी मातेची महाआरती आणि महाप्रसादाने होणार आहे. या सोहळ्याला पारंपरिक वेषातच उपस्थित राहावयाचे असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उमा-महादेवाच्या कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मुकुंद दादा अंधारे नवनाथ शक्तीपीठ ट्रस्टच्या अध्यक्ष सुवर्णा अंधारे आणि इतर पदाधिकाèयांनी केले आहे.
याआधी, शहरातील विविध नामांकीत मंदीरांमध्ये शाबरी कवच सहस्त्रावर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्यात श्री गजानन महाराज देवस्थान आणि महाकाली मंदीराचा समावेश आहे. कोरोनाकाळात शाबरी कवच सहस्त्रावर्तन सोहळा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आला. विशेष म्हणजे शाबरी कवच सहस्त्रावर्तन सोहळ्याचे औचित्य साधून प्रकाशित होणारा ‘किमया’ हा वार्षिकांक यावर्षीपासून डिजीटल स्वरूपात आणि त्रैमासिक स्वरूपात प्रकाशित होणार आहे. पूर्णत: नाथ संप्रदायाला समर्पित आणि संप्रदायाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी उपयुक्त ‘किमया’ विशेषांक अभ्यासक आणि भाविकांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
काय आहे शाबरी कवच?
नावाप्रमाणेच शाबरी अर्थात भिल्लीणीच्या रूपातील माता पार्वती आणि श्री महादेव यांच्यातील संवादातून शाबरी कवचाचा उगम झाला आहे. नाथ संप्रदायाचे आद्य श्री मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरक्षनाथ यांच्यासह नवनाथांच्या योगदानातून शाबरी कवचाची रचना झाली आहे. सामान्य माणसाच्या भौतिक समस्या संपुष्टात याव्यात आणि त्यांना सुखी-सकारात्मक जीवन जगण्यासह संकटांना तोंड देण्याची शक्ती मिळावी, या वैयक्तिक संकल्पातून शाबरी कवचाची आवर्तने करावीत, अशी मान्यता आहे. शिवाय, ‘जो जे वांछील तो ते लाहो’ या पसायदानातील उक्तीनुसार, समाजातील प्रत्येक वंचिताच्या उत्थानाकरीता शाबरी कवचाचे पठण लाभदायक ठरत असल्याचे संदर्भ आहेत.