मुंबई- MUMBAI ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, या जाहिरातीत केवळ EKNATH SHINDE एकनाथ शिंदे व नरेंद्र NAREDRA MODI मोदी यांचे फोटो असून यात बाळसाहेब ठाकरेंचा फोटो का नाही?, असा मुद्दा ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आलाय. शिंदेंची सेना ही शिवसेना नव्हे तर नरेंद्र मोदींच्या टाचेखालची शवसेना आहे, अशी टीका खासदार संजय राऊतांकडून करण्यात (Shiv Sena MP Sanjay Raut on Survey Advertisement) आली आहे.
ही जाहिरात सरकारी की खासगी, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी करताना राऊत म्हणाले की, ही जाहिरात जर सरकारी असेल तर भाजपच्या ज्या 105 आमदारांच्या बळावर शिंदेसेनेने सरकार स्थापन झाले आहे, त्या आमदारांपैकी एकालाही जाहिरातीमध्ये स्थान का दिले नाही, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस किंवा बावनकुळे यांनीच दिले पाहीजे, अशी मागणी त्यांनी केली. खोटा सर्व्हे करून मुख्यमंत्री शिंदे हे राज्यात प्रतिमा निर्माण करीत आहेत, अशी टीकाही विरोधकांकडून सुरु झाली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, ही जाहिरात खोटी आहे व धूळफेक करणारी आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांना त्यांची जागा समजेल. कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, ‘गुण नाही पण वाण लागला, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला’ अशी म्हणण्याची वेळ आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती तथा ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी सर्व्हेक्षण येत असतात व त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा सर्व्हे खोटा आहे, यातून खोटा दावा केला जात आहे, अशी टीका केली. शिंदे गटाचे नेते स्वतःला प्रमोट करण्याचे काम सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केली आहे.