शेतकरी नेत्याची पत्नी पोलिसांच्या ताब्यात

0

बुलढाणा BULDHANBA  : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी मुंबई-दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आल्यावर आज सकाळी तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर  Sharvari Tupkar यांना मलकापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. (Farmers Leader Ravikant Tupkar)

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्याकडून मुंबई-दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांकडून त्यांना गुरुवारी अटक केली. शुक्रवारी सकाळी तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर (Sharvari Tupkar) यांच्या नेतृत्वात मलकापूर रेल्व स्थानकावर आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर गनिमी कावाने त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वात मलकापूर रेल्व स्टेशनवर आंदोलन करण्यात आले. यावेळी आज सकाळीच शेकडो सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी मलकापूर रेल्वे स्टेशनवर पोहचले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रेल्वे पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.