अँटीबायोटीक औषधी..! केंद्राने डॉक्टरांना दिल्या या सूचना

0

नवी दिल्ली-डॉक्टरांनी रुग्णांना अँटीबायोटीक औषधे घेण्याचा सल्ला देताना त्यामागील नेमके कारण त्यात स्पष्ट केले पाहिजे, असा सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने डॉक्टरांच्या संघटनांना पत्र पाठवून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय लोकांना अँटीबायोटीक औषधी देऊ नका, अशा सूचना भारतातील सर्व फार्मासिस्ट असोसिएशना पत्र पाठवून करण्यात आल्या आहेत. देशात अँटीबायोटीक्सचा वापर वाढला असून, ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालक डॉ अतुल गोयल यांनी नमूद केलेय की, “अँटीमायक्रोबियल औषधी लिहून देताना डॉक्टरांनी त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर नेमके संकेत नमूद करणे महत्त्वाचे आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टरांनी अँटिबायोटीक्स औषधे लिहून देताना अचूक संकेत, कारण किंवा औचित्य अनिवार्यपणे नमूद करावे”

केंद्र सरकारने हे पाऊल उचलण्यामागे महत्वाचे कारण पुढे आले आहे. एखादी व्यक्ती वारंवार अँटीबायोटीक औषधांचा वापर करत असेल तर त्या औषधाविरुद्ध शरीरात जिवाणूंची प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्याचा परिणाम असा होती नंतर कितीही अँटिबायोटीक औषधे दिली तरी त्याचा परिणाम होत नाही. जिवाणूंमध्ये त्या औषधांप्रती प्रतिकारशक्ती निर्माण झाली असल्याने आजार बरा करणे खूप कठीण जाते. याला अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) असे म्हणतात. अँटी-मायक्रोबियल्स औषधांमध्ये अँटी-सेप्टिक, अँटी-बायोटिक, अँटी-व्हायरल, अँटी-फंगल आणि अँटी-परजीवी औषधांचा समावेश होतो. जर रुग्णाला कमी अँटीबायोटीक घेण्याचा सल्ला दिला जात असेल तर त्याचे कारण देखील सांगा, असेही पत्रात असे म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०१९ मध्ये सुमारे १३ लाख लोकांच्या मृत्यूसाठी एएमआर हे कारण होते. याशिवाय ड्रग रेझिस्टन्स इन्फेक्शनमुळे ५० लाख मृत्यू झाले आहेत.