
गडचिरोली GADHCHIROLI : गडचिरोलीच्या दक्षिण भागात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला अखेर पिंजराबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. दोन महिलांचा बळी घेणाऱ्या या tiger वाघिणीला Dr. Ravikant Khobragade डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वातील पथकाने गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास पिंजराबंद करुन मोहिम फत्ते केली. ही वाघिण अंदाजे अडीच वर्षांची आहे. वन विभागाच्या या कारवाईमुळे नागरिकांची दहशतीपासून मुक्तता झाली आहे. चंद्रपूरप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील वाघांचे हल्ले वाढले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणेच उत्तर गडचिरोलीनंतर आता दक्षिण भागातही वाघांचे हल्ले वाढले आहेत. उत्तर भागात सक्रीय असलेले वाघ दक्षिण भागात स्थलांतर करीत आहेत. याच महिन्यात वाघिणीने शेतात काम करणाऱ्या सुषमा देवदास मंडल( वय ५५), रमाबाई मुंजमकर ( वय ५५) या दोन महिलांवर हल्ला करुन त्यांना ठार मारल्याने दक्षिण गडचिरोलीतील गावांमध्ये लोकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास कोणीही शेतात जाण्यास धजावत होते. दिवसा देखील शेतात जाताना लोक सावधगिरी बाळगून जात होते. ७ आणि १५ जानेवारीला घडलेल्या या घटनानंतर वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून सुरु होती. त्यामुळे वन विभागाने १६ जानेवारी रोजी वाघिणीला पकडण्यासाठी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ तयार केली. वाघिणीला पिंजराबंद करण्याचे प्रयत्न सुरुच असतानाच गुरुवारी रात्री यश आले.