नेमक हत्येचं कारण काय?  

0

युवा सेना शहर प्रमुखाची हत्या 

CHNDRAPUR चंद्रपूर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे  Uddhav Balasaheb Thackeray युवा सेनेच्या शहर प्रमुखाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या उच्चभ्रू सरकारनगर भागात चाकूने सपासप वार करून शहर प्रमुखाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. 30 वर्षीय शहर प्रमुखाचा मृतदेह त्याच्याच एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. मृत व्यक्तीच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि हायवा वाहनांची मोडतोड केली आहे.

चंद्रपूर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेचे शहर प्रमुख शिवा वझरकरची निर्घृण हत्येची घटना उघडकीस आली आहे. उच्चभ्रू सरकारनगर भागात चाकूने सपासप वार करून शिवा वझरकर  Shiva Vazarkar याची हत्या करण्यात आली. 30 वर्षीय वझरकर याचा मृतदेह त्याच्याच एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात तणाव निर्माण झालाय. घटनेनंतर वझरकर याच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि हायवा वाहनांची जोरदार मोडतोड केली आहे.

चंद्रपूरच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी उबाठा गटाच्याच 3 कार्यकर्त्याना अटक, अरविंदनगर भागातील स्वप्नील काशीकर नामक मित्राच्या कार्यालयापाशी आढळला मृतदेह, मृतक आणि 3 आरोपी यांच्यात काही दिवसापासून सुरू होती वैयक्तिक कारणावरून धुसफूस, शिवा याला भेटायला बोलावून करण्यात आली हत्या, शिवा समर्थकांनी याभागात उभ्या असलेल्या जेसीबी आणि हायवा यांची तोडफोड करून व्यक्त केला संताप, हत्येनंतर पळून जाणाऱ्या स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आसकर यांना पोलिसांनी रात्रीच केली अटक, रामनगर पोलिस उकलत आहेत या हत्या प्रकरणातील दुवे

चंद्रपूरच्या उबाठा गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी उबाठा गटाच्याच 3 कार्यकर्त्याना अटक करण्यात आली आहे. शिवा वझरकर नामक उबाठा गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाची गुरुवारी रात्री चाकूने वार करून हत्या करण्यात आली. अरविंदनगर भागातील स्वप्नील काशीकर नामक मित्राच्या कार्यालयापाशी त्याचा मृतदेह आढळला. मृतक आणि 3 आरोपी यांच्यात काही दिवसापासून वैयक्तिक कारणावरून धुसफूस सुरू होती. त्यावरून शिवा याला भेटायला बोलावून त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर शिवा समर्थकांनी या भागात उभ्या असलेल्या जेसीबी आणि हायवा यांची तोडफोड करून संताप व्यक्त केला. हत्येनंतर पळून जाणाऱ्या स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आसकर या उबाठा गटाच्या 3 कार्यकर्त्याना पोलिसांनी रात्रीच अटक केली. रामनगर पोलिस या हत्या प्रकरणातील दुवे उकलत आहेत.