
नागपूर NAGPUR – महिला, गरीब, शेतकरी आणि युवक हे चार महत्त्वाचे घटक डोळ्यापुढे ठेवून केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आलेली आपली अर्थव्यवस्था येत्या तीन ते पाच वर्षात तिसऱ्या क्रमांकाची होईल असा संकल्प यात आहे. परराष्ट्र धोरणात आपला दबदबा असून पायाभूत सुविधा व विविध क्षेत्रात गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
भविष्यातही मोदी सरकार राहिल्यास अर्थव्यवस्था अधिक भक्कम होऊन 2027 पर्यंत विकसित भारताच्या दिशेने सकारात्मक पावले पडतील असा विश्वास शिवानी दाणी वखरे यांनी व्यक्त केला. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीने सुवर्णसंधी असून विदेशी गुंतवणूकदारांचा भारताकडे ओढा वाढत असताना आज नवनवीन क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होत आहेत. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड एस आय पी महिन्यालाच नव्हे तर आता दररोज एसआयपी आली असून भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत असताना तुम्ही मागे राहू नका आर्थिक संपन्नतेच्या मार्गावर चालण्यास सज्ज व्हा असे आवाहन आशुतोष वखरे यांनी केले. बजेटमध्ये साधारणताः काय स्वस्त झाले ,काय महाग झाले,फक्त एवढेच बघितल्या जाते. पण सामान्य जनतेसाठी बजेट विश्लेषण ही अतिशय महत्वाची बाब असुन ती सोप्या भाषेत समजविण्याचा प्रयत्न सायंटिफिक हॉल, लक्ष्मीनगर येथे आयोजित कार्यक्रमात मनी बी इंस्टिट्युट प्रायवेट लिमिटेडच्या संचालिका शिवानी दाणी वखरे,आशुतोष वखरे यांनी केला. मार्गदर्शनानंतर उपस्थितांच्या प्रश्नांचे निराकरण केले.