
अमरावती- आज सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्प २०२४ वर नजर टाकली असता भाजप सरकार निवडणुकीच्या तोंडावर काहीही घोषणा करत आहेत, आणि वास्तविकतेशी काही घेणे देणे नाही. यात शेतकऱ्यांना चुना लावण्यात आला आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी काहीचं नियोजन नाही, बेरोजगारांसाठी काहीचं नियोजन नाही आहे, पेट्रोल आणि डिझेलचे दर तेवढेच आहेत, शेतकऱ्यांना शेतीच्या शेतमालाला भाव मिळत नाही, कपाशीचे भाव यापूर्वी इतके कमी कधीच नव्हते. 2009 मध्ये 10, 11हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. मात्र, आता 4000 च्या खाली भाव देत आहेत.प्रत्येकाला म्हणत आहेत की तुम्ही अयोध्येत जा, दर्शन करून घ्या आणि इतर प्रश्न बजेटमध्ये शून्य आहेत.
अर्थमंत्री निर्मला सितारामन या पॉवररफुल आहेत असे वाटलं होतं. छान घोषणा या ठिकाणी करतील. पण आता वाटायला लागल आहे की त्यांच्याही हातात काही राहिलेले नाही. त्यांच्यासमोर जो कागद येतो, ते त्या वाचतात. त्यापलीकडे त्यांना डोकं वापरण्याची मुभा दिलेली दिसत नाही. हा अर्थसंकल्प अत्यंत अपयशी आहे. उद्याच्या भविष्यासाठी नियोजन झालेले दिसत नाही.