

नागपूर(Nagpur), ८ मे २०२६: जागतिक थॅलेसेमिया दिन व सप्ताह निमित्त डागा शासकीय रुग्णालय, नागपूर येथे नर्सिंग कर्मचाऱ्यांसाठी थॅलेसेमिया तपासणी शिबिर घेण्यात आले.
डॉ. संजय देशमुख, प्रभारी, हिमॅटोलॉजी डे केअर सेंटर यांनी किशोरवयीन लोकसंख्येमध्ये HPLC तपासणीचे महत्त्व विशद केले. लग्नापूर्वी केवळ कुंडली न जुळवता शासकीय रुग्णालयात साधी HPLC चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी पालकांना केले.
या जनजागृती मोहिमेतील सहकार्याबद्दल डॉ. देशमुख यांनी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. काळे यांचे आभार मानले.
या शिबिरात श्री रोहित जैस्वाल यांनी ५० हून अधिक नर्सिंग कर्मचाऱ्यांची HPLC तपासणी केली. टीम डागा चे श्री संदीप पोरातकर व कु. लीना बोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
ओबीसी जनगणनेसाठी स्वातंत्र्यलढ्यासारखा संघर्ष उभारा : सचिन राजूरकर
May 31, 2026Artical Blog


















