सणानिमित्त मुंबई, पुण्यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

0

नागपूर NAGPUR – नवरात्र, दसरा, दिवाळी, छट पुजेनिमित्ताने रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या चालविल्या जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. (Special festival trains for Pune, Mumbai)

रेल्वेने दिलेल्य माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट स्पेशलच्या २० फेऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. गाडी क्र. 02139 सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. १९.१०.२०२३ ते २०.११.२०२३ या कालावधीत सोमवार आणि गुरुवारी ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. गाडी क्र. 02140 सुपरफास्ट स्पेशल दि. २१.१०.२०२३ ते २१.११.२०२३ या कालावधीत मंगळवार आणि शनिवारी १३.३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा असे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीत १६ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हॅनचा समावेश आहे.

नागपूर-पुणे-नागपूर प्रवासासाठी नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशलच्या १० फेऱ्या राहणार आहेत. गाडी क्र. 02144 सुपरफास्ट स्पेशल दि. १९.१०.२०२३ ते १६.११.२०२३ या कालावधीत प्रत्येक गुरुवारी १९.४० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पुणे येथे पोहोचेल. गाडी क्र. 02143 सुपरफास्ट स्पेशल दि. २०.१०.२०२३ ते १७.११.२०२३ पर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून १६.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरूळी येथे थांबे देण्यात आले आहेत. गाडीला १६ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हॅन आहेत.