मुख्यमंत्री राज ठाकरेंकडे गेले, यावरून टोलचा झोल किती मोठा? हे कळते – विजय वडेट्टीवार

0

 

नागपूर – टोल माफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. ती एका जिल्ह्यापुरती टोल माफी नसावी. सर्व जिल्ह्यात असावी. त्याची अंमलबजावणी करावी ही मागणी जनतेची आहे. मात्र, आज सत्ताकेंद्र बदलत आहे का? मुख्यमंत्री राज ठाकरे यांच्याकडे गेले. यावरून टोलचा झोल किती मोठा? हे पुढे आल्याचे टीकास्त्र विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोडले आहे.
मागासवर्गीय जाहिराती संदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले,
जाहिराती निडणुकीच्या तोंडावर का दिल्या? 31 कोटी रुपये का खर्च होतायत? विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे.भाजप ओबीसी जागर यात्रा संदर्भात बोलताना आशिष देशमुख कधी ओबीसी झाले? त्यांना कोणतीही जबाबदारी नसल्याने ही यात्रा आहे.
ओबीसी आणि सरकार बैठकीचे मिनिटस अजून आले नाहीत. 30 दिवस होत आहेत यावर त्यांनी भर दिला.
कंत्राटीकरणं बाबतीत छेडले असता
राज्यात 1 लाख पदे भरण्याचं काम सुरू झाले आहे. 5 वर्षाचा कंत्राट, नौकरी असेल तर वयाच्या 35 व्या वर्षानंतर हे तरुण काय करतील? पोलीस सुरक्षा खाजगीकरण का करताय? राज्याची सुरक्षा व्यवस्था हे उध्वस्त करत आहेत. आमचे सरकार आले, तर मी तरुणांना आश्वस्त करतो की, मी त्यांना शासकीय नोकरीत घेईल.वाघ नखं आणण्यासाठी गेलेले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नागपुरात स्वागत झाले. याबाबत बोलताना, अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला नाही. महाराजांचे गडकिल्ले कशा अवस्थेत आहेत, त्यांच्याकडे लक्ष नाही, स्मारकाबाबत काही नाही.
अजित पवार यांचे स्वप्न कधी पूर्ण होणार, अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही. महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. राज्यात सर्वात मोठा पक्ष काँग्रेस राहील. एकमेव पक्ष आहे, ज्यामध्ये तडा गेला नाही. काँग्रेस मोठा भाऊ आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सर्वाधिक जागा येईल आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असा दावा
विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते यांनी केला.