Home Artical Blog नागपूरच्या 6 महिला बाईक रायडर्सची यशस्वी भरारी

नागपूरच्या 6 महिला बाईक रायडर्सची यशस्वी भरारी

0

‘क्विन्स ऑन द व्हील’ द्वारे निघाल्या मध्य भारताच्या शोधात

नागपूर(Nagpur), 8 मार्च

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मध्य प्रदेश(Madhya Pradesh) पर्यटन आणि CAC–Allrounder Adventures यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
‘क्विन्स ऑन द व्हील’ या केवळ महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोटारसायकल मोहिमेच्या तिसऱ्या आवृत्तीचा शुभारंभ भोपाल येथे
मध्य प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव(Mohan Yadav) यांच्या हस्ते भोपाल(Bhopal) येथील मुख्यमंत्री निवासस्थानातून ध्वज दाखवून करण्यात आला.

या मोहिमेत देशातील विविध भागांमधून 25 महिला रायडर्स सहभागी झाल्या असून त्यात नागपूरच्या सहा रायडर्सचा समावेश आहे. त्यात डॉ. प्रियांका श्रीवास, रुक्मिणी पुनवटकर, पल्लवी देशमुख, रुचिका मेघे, मैथिली सिंह व एकता खंते या महिला रायडर्स मध्य भारताचा बाईकवरून शोध घेण्यासाठी निघाल्या आहेत.

या ध्वजवंदन समारंभाला उच्च शिक्षण मंत्री श्री. इंदर सिंह परमार, मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे (MPTDC) व्यवस्थापकीय संचालक श्री. इलैया राजा तसेच MPTDC चे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. बेडेकर उपस्थित होते.

मोटारसायकलिंगच्या माध्यमातून साहस, आत्मविश्वास आणि महिला सशक्तीकरण साजरे करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. समारंभानंतर रायडर्स सांची येथे असलेल्या सांची स्तूपाकडे रवाना झाल्या. भारतातील अत्यंत महत्त्वाच्या बौद्ध वारसा स्थळांपैकी एक आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या या ऐतिहासिक स्मारकाला त्यांनी भेट दिली आणि परिसरातील समृद्ध सांस्कृतिक वारसा अनुभवला.
त्यानंतर रायडर्सनी मध्य प्रदेशातील निसर्गरम्य परिसरातून प्रवास करत ऐतिहासिक उदयगिरी गुंफा येथे रात्री मुक्काम केला.
आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने रायडर्सनी उदयगिरी येथून चंदेरीकडे प्रवास सुरू केला. चंदेरी(Chanderi) येथे त्यांनी ‘चंदेरी टेंट सिटी’मध्ये मुक्काम केला.
या भेटीदरम्यान सहभागी रायडर्सनी चंदेरीच्या समृद्ध वारशाचा अनुभव घेतला. येथे असलेले ऐतिहासिक किल्ले, मंदिरे तसेच जगप्रसिद्ध चंदेरी साड्या यांची त्यांनी पाहणी केली.
…….

अधिक माहितीसाठी:
एकता खांते – 9970834119
मैथिली सिंह – 7709881403