सुधीर मुनगंटीवार यांचं राजेंद्र सिंहकृत कौतुक!

0

चंद्रपूर CHNDRAPUR   : आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीचे नेहमीच चर्चेत राहणारे राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार Minister Sudhir Mungantiwar  यांच्यावर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव झाला आहे. हा वर्षाव केला आहे देशाचे जलपुरूष आणि जलबिरादरीचे प्रमुख राजेंद्र सिंह Rajendra Singh  यांनी.चंद्रपुरात सध्या ‘चला जाणुया नदीला’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांची स्वच्छता, पुनरूज्जीवन आदी कार्य करण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी जलपुरूष राजेंद्र सिंह अलीकडेच चंद्रपूर येथे भेट देवून गेले. त्यांनी या उपक्रमाला अगदी जवळून पाहिले. त्यातील कामाची माहिती प्रत्यक्ष पाहणी केली, माहितीही घेतली.नद्यांच्या स्वच्छता आणि पुनरूज्जीवनाचा हा उपक्रम पाहिल्यावर राजेंद्र सिंह चांगलेच प्रभावित झाले आहेत. चंद्रपुरातील हा उपक्रम पाहता त्यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात व कॅबिनेटमध्येही सुधीर मुनगंटीवार यांचे चांगलेच वजन आहे. याचा प्रत्यय नेहमीच अनेकांना आला आहे.

असाच दाखला जलपुरूष राजेंद्र सिंह यांनीही दिला आहे.‘चला जाणुया नदीला’ या उपक्रमासाठी राज्य सरकारने अगदी तीनच दिवसात अधिसूचना प्रकाशित केली. ही बाब सिंह यांनी सुधीर मुनगंटीवार यांना पाठविलेल्या एका पत्रातून अधोरेखित केली आहे. चंद्रपुरात झालेले काम पाहता सिंह यांनी नद्यांना वाचविण्याचे हे ईश्वरीय कार्य असून राज्यातील इतर लोकप्रतिनिधींनी याचा आदर्श घेतल्यास महाराष्ट्रातील नद्यांचा कायापालट झालेला दिसेल यात शंकाच नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.विदर्भाचा व्हावा कायापालटविदर्भातील 11 जिल्ह्यांमधून अनेक लहानमोठ्या नद्या प्रवाहित आहेत.

त्यातील अकोला जिल्हतया 27, अमरावतीतून 27, गडचिरोलीत 14, चंद्रपुरात 06, नागपुरातून 14, बुलढाण्यातून 13, भंडाऱ्यातून 09, यवतमाळातून 13, वर्धेतून 10, वाशिम जिल्ह्यातून 08 आणि गोंदियातून 07 नद्या प्रवाहित आहेत. यापैकी बहुतांश नद्यांचे रुपांतर आता नाल्यांमध्ये झाले आहे. कचरा, अस्वच्छता, जलकुंभी आणि नाल्यांमधून येणाऱ्या अस्वच्छ पाण्यामुळे या नद्या प्रदूषित झाल्या आहेत.काही वर्षांपूर्वी नागपुरात नाग नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अकोल्यातही तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी शहराच्या मध्यभागातून प्रवाही असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी लोकचळवळ राबविली.

मात्र दीर्घकाळापर्यंत हे उपक्रम चालू शकले नाही. केंद्र सरकारने नद्यांच्या स्वच्छतेसाठी, नदीजोड प्रकल्पासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. ‘नमामी गंगे’ प्रकल्पामुळे गंगेचा प्रवाह सुरळीत झाला आहे. अशाच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही राज्यातील सर्व नद्यांच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी व गरज भासल्यास ती जबाबदारीही सुधीर मुनगंटीवार यांच्या किंवा त्यांच्या सारख्या एखाद्या सक्षम व्यक्तीच्या खांद्यावर टाकावी, अशी अपेक्षा चंद्रपुरातील नदीसंदर्भातील चळवळ पाहता होत आहे.