
हरभजनसिंगने पक्षालाच फटकारले!
चंदिगड: CHNDIGADH अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंना निमंत्रण मिळाले आहे. त्यात हरभजनसिंने याचाही समावेश असून यानिमित्ताने हजरभजनसिंग याने आपल्या पक्षाला देखील घरचा आहेर दिलाय. हरभजनसिंग हा आम आदमी पार्टीचा राज्यसभा खासदार आहे. राम मंदिर कार्यक्रमासाठी जाणार का, असा प्रश्न विचारला असता हरभजनसिंग याने आपण कार्यक्रमाला नक्की जाणार असल्याचे सांगितले. “ज्याला जायचे नसेल त्याने जाऊ नये, मी जाईन.”, या शब्दात त्याने पक्षाला घरचा अहेर दिला. (Harbhajan Singh On Ram Mandir)
आम आदमी पार्टीने हा भाजपचा कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. त्यामुळे खासदार हरभजनसिंग उपस्थिती लावणार काय, याकडे लक्ष लागले होते. एएनआयशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, ‘कोण काय म्हणतो हा खूप वेगळा मुद्दा आहे. हे मंदिर यावेळी बांधले जात आहे हे आमचे भाग्य आहे, त्यामुळे आपण सर्वांनी जाऊन आशीर्वाद घ्यावा, कोणी जावो वा न जावो, माझी देवावर श्रद्धा आहे, श्रद्धा असेल तर मी जाईन.” हरभजन सिंगने इतर पक्षांवरही टीका केली. “काँग्रेसला जायचे असेल तर जावे, माझ्या राम मंदिरात जाण्याबाबत कोणाला काही अडचण असेल तर ते त्यांना हवे ते करू शकतात. माझा देवावर विश्वास आहे, माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते देवाची कृपा आहे, मी नक्कीच आशीर्वाद घेण्यासाठी जाईन.”