ठाणेः (thane)“महाराष्ट्राला अतिशय फडतूस गृहमंत्री लाभले आहेत. लाचार, लाळघोटे करणारे. नुसती फडणवीसी करणारा माणूस गृहमंत्रीपद मिरवतोय. त्यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. सरकारच नपुंसक म्हटल्यावर कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या”, अशी वैयक्तिक टीका उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) फडणवीस यांच्यावर केली. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना काल ठाणे शहरात कथित मारहाण प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची आज भेट घेतली. त्यानंतर परिषदेत बोलताना ठाकरेंनी गृहमंत्री(Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान केले.
मुख्यमंत्री की गुंडामंत्री?
(Uddhav Thackeray)उद्धव ठाकरे म्हणाले की, जिवाला जीव लावणारे, महिलांचे संरक्षण करणारे, आनंद दिघेंचे ठाणे, अशी ठाण्याची सुसंस्कृत ओळख होती. मात्र, आता गुंडांचे ठाणे, अशी ठाण्याची ओळख होत आहे. ठाण्यात महिलांचीही गँग तयार केली जातेय का? महिला कार्यकर्त्यांवर महिलांकडूनच अशी अमानुष मारहाण यापूर्वी महाराष्ट्रात कधीही झाली नव्हती. मुख्यमंत्री (Eknath Shinde)एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणायचे की गुंडमंत्री? असा प्रश्न आता पडला आहे. एकनाथ शिंदे आता गुंडांचे मंत्री झाले आहेत. मनात आणल तर आता या क्षणाला ठाणेच काय अवघ्या महाराष्ट्रातून या गुंडांची गुंडगिरी आम्ही उखडून फेकून देऊ शकतो. राज्य सरकार नपुंसक असेल. मात्र, शिवसैनिक हा नपुंसक नाही. बाळासाहेबांच्या नावाने या गुंडांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला आहे. मात्र, महिलांवर हल्ला करणारे हे नपुंसक आहेत, अशी टीका त्यांनी केली.