दहशतवाद्यांचा घातपाती कारवायांचा कट उधळला

0

मुंबई Mumbai : स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला Independence Day दहशतवाद्यांनी terrorist घातपाताचा कट रचल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून महाराष्ट्र एटीएसलामिळाली आहे. दहशतवादी संघटना अल सुफा आणि आयसिसशी संबंधित अनेकांना गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातून अटक करण्यात असून त्यांची महाराष्ट्र एटीएसने कसून चौकशी केली असता त्यांचा हा कट उघड झाला. मोहम्मद युनूस साकी, मोहम्मद इम्रान युनूस खान, झुल्फिकार बरोडावाला, शाहनवाज आलम Mohammad Yunus Saki, Mohammad Imran Yunus Khan, Zulfikar Barodawala, Shahnawaz Alam अशी या दहशतवाद्यांनी नावे आहेत.

एटीएसने अलीकडेच झुल्फिकार अली बडोदावाला याला ताब्यात घेतले आहे. त्याला एनआयएने आयसीस मॉड्यूलशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून गेल्या महिन्यात अटक केली होती. झुल्फिकार अली बरोडावाला याने ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे फ्लॅट भाड्याने घेतला होता का आणि मुंबईतील प्रमुख ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी हा फ्लॅट भाड्याने घेतला होता का, याचाही तपास सुरु आहे. आयसीस आणि आणि अल सुफा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित राज्यभरातून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि पुण्याजवळ दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतले तर निपाणी, संकेश्वरमध्ये मुक्काम केला होता. अल-सुफा ही दहशतवादी संघटना मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात स्थापन झाली होती. या संघटनेचे लक्ष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व भाजपचे नेते असल्याचे तपासून पुढे आले आहे. मध्यप्रदेशातून येऊन पुण्यात तळ ठोकल्यावर कोकणात प्रशिक्षण घेऊन 15 ऑगस्टला घातपात घडवण्याच्या प्रयत्नात दहशतवादी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.