मुंबईः (MUMBAI )अदानी प्रकरणात (SHARAD PAWAR)शरद पवारांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतच बेबनाव दिसत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पवारांच्या (MP Sanjay Raut on Sharad Pawar`s stand on Adani Issue ) वेगळ्या भूमिकेमुळे विरोधकांच्या एकजुटीत महाराष्ट्रात किंवा राष्ट्रीय स्तरावर कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा केला. “शरद पवारांची भूमिका पहिल्यापासूनची आहे. त्यात नवीन काही नाही. संसदेचे अधिवेशन न चालण्यात केवळ गौतम अदानींच्या चौकशीचा विषय नव्हता, महागाई होती, बेरोजगारी होती. या देशात उद्योग वाढले पाहिजेत, उद्योगपती जगला पाहिजे. उद्योगपतींशिवाय देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही. अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही, ही भूमिका सगळ्यांचीच आहे”, असेही राऊत म्हणाले. आम्ही जेपीसी चौकशीच्या मागणीवर ठाम आहोत, असेही त्यांनी सांगितले.
राऊत म्हणाले की, (SHARAD PAWAR)पवार साहेबांनी अदानींसंदर्भात वेगळी भूमिका घेतली असली तरी महाविकास आघाडीला(MAHARASHTRA) महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचे तडे जाणार नाहीत. एलआयसी आणि (SBI)स्टेट बँकेमधील पैसे हे जनतेचे पैसे आहेत. ते कशा प्रकारे (BJP)भाजपने आपल्या जवळच्या उद्योगपतींच्या खिशात घातले हे समोर आले आहे. लोकांना काही नवीन माहिती मिळाली. एका उद्योगपतीसाठी संपूर्ण देशाची शक्ती कशी पणाला लावत आहेत हेसुद्धा समोर आले, असेही राऊत म्हणाले.
तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी (CONGRESS)काँग्रेसची स्वतंत्र भूमिका होती, असे सांगताना राऊत म्हणाले की, शरद पवारांनी न्यायालयीन चौकशीचा पर्याय दिला आहे. ममता बॅनर्जी असो, तृणमूल काँग्रेस किंवा एनसीपी अदानींच्या बाबतीत त्यांचे वेगळे मत असू शकते. परंतु त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीत महाराष्ट्रात किंवा राष्ट्रीय स्तरावर कोणतीही फूट पडणार नाही, असेही ते म्हणाले.
चिकन साते विथ पीनट सॉस आणि मोतीचुर रबडी पर्फेत|Chicken Satay With PeanutSauce|Motichur Rabdi parphet
https://youtu.be/o0Z46w8eJpY?list=PLfo99UFoWEZLVJ7cGqjYq4v_wsukEAIo_