ब्राऊन शुगरसह दोघांना अटक

0

 चंद्रपूर शहर गुन्हेशोध पथकाची कारवाई

 

chndrapur -चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने  गोपनीय माहितीच्या आधारे एका व्यक्तीच्या घरी धाड घालून ब्राऊन शुगर जप्त केले आहे. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. सोहेल सलीम शेख (२३) रा. जुनी लालपेठ वस्ती चंद्रपूर, आवेश शब्बीर कुरेशी (३८) रा. भंगाराम वॉर्ड चंद्रपूर अशी अटकेतील आरोपीची नावे आहे.

सोहेल सलीम शेख हा ब्राऊन शुगर विकत असल्याची गोपनीय माहिती शहर गुन्हेशोध पथकाला मिळाली होती. या माहिती आधारे शहर गुन्हेशोध पथकाने सापळा रचून सोहेल सलीम शेख याला ताब्यात घेत अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याजवळून ७.१२ ग्रॅम वजन असलेले ब्राऊन शुगर आढळून आले. ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले असून, जप्त ब्राऊन शुगरची किमत १७ हजार ८०० रुपये आहे. शिवाय दोन मोबाइल आणि रोख ११० रुपये असा एकूण ५७ हजार ९१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.