कर्मचाऱ्यांनी आयुक्तांपुढे का केले आंदोलन ?

0

 

अमरावती AMRAWATI – अमरावती शहरातील एमआयडीसी मधील  Jadhav Gears Ginning and Pressing Automation जाधव गिअर्स जिनिंग अँड प्रेसिंग ऑटोमेशन कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कंपनी बंद केली. त्यामुळे या कारखान्यात काम करणारे ऑपरेटर, टर्नर, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, हेल्पर तसेच कार्यालयीन कारकून असे 60 कामगार एकाच वेळी बेरोजगार झाले. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर हा थेट अन्याय आहे. त्यामुळे प्रशासनाने आपल्या अधिकारांचा वापर करून कंपनी मालकांच्या इतर कंपनीत या कामगारांचे समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी या 60 कामगारांनी आजाद समाज पार्टीच्या नेतृत्वात गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आज पाचव्या दिवशी कामगारांच्या सह कुटुंबासोबत कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनी आंदोलन सुरू केले.

 

आशा व गटप्रवर्तकांचे रास्ता रोको

अमरावती- AMRAWATI  महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक  ASHA GTPRAWARTK संघटना आयटक व महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति राज्य व्यापी बेमुदत संपाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्यांबाबत अद्यापही शासन निर्णय न काढल्यामुळे राज्य भरातील सह जिल्हातील आशा व गटप्रवर्तक बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी आजपासून जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक अमरावतीच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले.

 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

 

अमरावती  AMRAWATI – अंगणवाडी  ANGANVADI SEVIKA कर्मचाऱ्यांच्या 4 डिसेंबर 2023 पासून जिल्ह्यासह राज्यात अंगणवाडी सेविकांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. राज्यव्यापी बेमुदत संपाला आज 40 दिवस होत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संघटना सिटीच्या वतीने अमरावतीच्या गांधी चौक येथील प्रकल्प कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन केले. 27 वर्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. 22 जानेवारीच्या अगोदर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, तेव्हाच आम्ही दिवे लावू, देवींची मागणी पूर्ण करा मग रामाला आणा अशी प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांनी दिली.