
विदर्भ साहित्य संघ, शंभर वर्षांची परंपरा लाभलेली साहित्य जगतातली विदर्भातील एक मोठी नामवंत संस्था. पण गेल्या काही वर्षांपासून या संस्थेला एका घाणेरड्या साचलेल्या डबक्याचं/ गटाराचं रूप प्राप्त झालं आहे.
साहित्य संघाचं हे डबकीकरण/ गटारीकरण म्हैसाळकरांच्या काळापासून सुरू झालं होतं आणि आजतागायत ते तसंच सुरू आहे. आणि येत्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे उमेदवार पाहून ( यातील एखादा अपवाद सोडून ) हे गटारीकरण थांबण्याची आशा मला अजिबात वाटत नाही. साहित्य संघाचं रूपांतर एका कुजलेल्या व्यापारी संकुलात झालेलं सर्व जगाला दिसते आहे. विदर्भातील एक अतिशय सुंदर आणि महत्वाचं साहित्यिक / सांस्कृतिक घडामोडिंच केंद्र जे धनवटे रंग मंदीर साहित्यातील औरंगजेबांनी नष्ट, उध्वस्त करून टाकलं आहे. आणि ते आज 35 वर्षांनंतर सुद्धा कुठेही दृष्टीपथास येतांना दिसत नाही. साहित्य संघातील या अशा भ्रष्ट कृतीच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या आपल्याच सन्माननीय सदस्यांना (प्राचार्य डॉ. वि. स. जोग, डॉ. कुमार शास्त्री, कवी अनिल शेंडे, दै. नवराष्ट्रचे संपादक दिनकरराव देशपांडे, श्री अविनाश पाठक, कै. योगेश बऱ्हाणपूरे इत्यादी )बेकायदेशीर पद्धतीने निष्कासित करण्यापर्यंत मजला गेलेल्या या भ्रष्टाचार्यांच्या विरोधात त्यावेळी त्या कार्यकारिणीतील एकही आवाज उठला नव्हता.
इतके सारेच्या सारे लाचार आणि त्या हिटलरी अध्यक्षांच्या ताटाखालची मांजरं सर्व सदस्य झाले होते. त्या भ्रष्ट अध्यक्षाच्या महापरिनिर्वांणानंतर त्यांच्या गादीवर आलेल्या अध्यक्ष्यांना आणि सदस्यांनाही आपल्या पूर्वीच्या अध्यक्षाने आणि कार्यकारिणीने केलेलं हे महापाप निस्तरावं आणि मनमानी हिटलरी पद्धतीने निष्कासित केलेल्या सदस्यांना पुन्हा सन्मानाने त्यांचं सदस्यत्व बहाल करून त्या पापाचं परिमार्जन करावं असा विचार एकाही सदस्यांच्या मनात आला नाही, यावरून ही नवीन मंडळी सुद्धा त्यांच्या पूर्वसुरिंची भागीदार ठरत नाही काय ?
आता सध्या निवडणुकीत उभ्या असलेल्या एकातरी उमेदवाराने या भ्रषचाराविरुद्ध बकरीच्या बें बें इतका तरी आवाज उठवला होता काय ? मग काय अपेक्षा करावी या त्यांच्याच भ्रष्ट मार्गावरून चालणाऱ्या त्यांच्याच गोतावळ्याकडून ?
म्हणून वि सा संघावर काही काळ तरी कोणीतरी उत्तम प्रशासक नेमून त्याची घडी व्यवस्थित करण्याची कृपा शासनाने करावी ही माझी शासनाला विनंती आहे. नाहीतर त्या भ्रष्ट पूर्वसुरिंचा हा गोतावळा उरलेला विसा संघ आणि त्याची उरलीसुरली इज्जत विकून खाल्याशिवाय राहणार नाही .
-कवी अनिल शेंडे.














