विदर्भाला अवकाळी तडाखा

0

अमरावती, अकोला, नागपुरात वादळी पाऊस

 

नागपूर. हवामान विभागाचा (Meteorological Department ) इशारा खरा ठरवित अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भातील अनेक जिल्ह्यांना शुक्रवारी दुपारी वादळी तडाखा (Several districts of Vidarbha were hit by storm ) दिला. नागपूरसह अमरावती, अकोला (Amravati, Akola along with Nagpur ) व अन्य जिल्ह्यांतील भागांमध्ये सरी कोसळल्या. दुपारी अडीचच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट मळभ दाटून आले. भर दुपारीच सायंकाळ झाल्याचे भासले. पाहता पाहता वादळ सुरू झाले. विजांच्या कडकडाटासह सरी बरसल्या. पावसाच्या सरींमुळे तपत्या उन्हाच्या उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला. मात्र, अचानक पडलेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळही उडाली. शेतकऱ्यांची चिंता या अवकाळी पावसाने वाढविली आहे. शेतातील बराचसा माल काढण्यात आला असला तरी काही माल शेतात आहे. त्याशिवाय भाजिपाला, फळबागा आणि उन्हाळी धानाला या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे उन-पावसाचा खेळ सुरु आहे. शुक्रवारी सकाळीसुद्धा कडक उन्ह पडले होते. काही वेळातच उन-सावलीचा खेळ सुरू जाला. अचानक दुपारी आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. सोसाट्याचा वारा सुटला. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाड आणि विजांच्या कडकडाटांत पावसाने हजेरी लावली. सुटीचा दिवस असल्याने बहुतेक जण घरीच आहे. अनेकांनी हीच संधी साधून खरेदीचा बेत आखला होता. यामुळे अनेक प्रमुख बाजारांमध्ये गर्दी असतानाच पावसाळी वातावरण निर्माण झाले. घराबाहेर पडण्याच्या तयारीत असणाऱ्यांनी निसर्गाचा मुड लक्षात घेऊन घराबाहेर जाण्याचा बेत ऐनवेळी रद्द केला. सायंकाळ पर्यंत अनेक भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू होता. कुठे निव्वळ काळेकुट्ट ढग आणि विजांचा कडकडाटच सुरू होता. दरम्यान, हवामान खात्याने किमान आठवडाभर म्हणजे १३ एप्रिलपर्यंत विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात विजा व गडगडाटासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तविली आहे. यातच आज दुपारी झालेल्या पावसाने वातावरणात उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली. तर, पुढचे दोन दिवस म्हणजे ७ व ८ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी किरकोळ पाउस व गारपिटीचीही शक्यता आहे. पाऊस ओसरताच मात्र सूर्याच्या प्रकोपाचा सामना करावा लागणार आहे.